सुरूवात

“ही रिंग कसली आहे? बर्थडे गिफ्ट?”
“अरे माझी एंगेजमेंट झाली!!!”
“कधी? आणि तुझा तर बोयफ्रेंड होता!!! त्याचं काय झालं?”
“मी रिलेशनशिपमध्येच आहे रे ,पण माझ्या घरच्यांना आत्याचा मुलगा आवडला त्यामुळे त्यांनी लग्न ठरवलं. पैसेवाला आहे, पण मला मात्र इंटरेस्ट नाही.”
“मग, तू काय करायचं ठरवलं आहेस?”
“MSW पूर्ण करायचं आहे. मग चाईल्ड वेल्फेअर ओफिसर पदासाठी परीक्षेची तयारी.”
“अबे, बावळट. हे सगळं माहिती आहे मला. पण आता लगेच काय करायचं ठरवलं आहे तू? घरचे थांबणार आहेत का, पोस्टग्रॅज्युएशन होईपर्यंत ?”
“हो! थांबतील ”
“पण तुझ्या बोयफ्रेंडचं कसं मग?”
“मी सिद्धार्थशीच लग्न करणार आहे!!!”
“मग ही एंगेजमेंट मोडणार, म्हणजे लग्न पण मोडणार!!! तू तुझ्या घरच्यांना या सगळ्या गोष्टींची कल्पना . . . . . . . . . . 
“त्याचा काही एक उपयोग नाही. मोठ्या दिदीचं अरेंज झालं. आता माझं सुध्दा तेच व्हावे, हा त्यांचा आग्रह.पैशापुढे मुलीची आवड निवड सर्व गाैण आहे त्यांच्यासाठी.”
“शिट यार. असं व्हायला नको होतं”
” तो बारावी पास आहे. सधन शेतकरी म्हणतात त्याला सगळे, पण शेती त्याचा बापच करतो. हा कार घेऊन गावं हिंडतो आणि बापाच्या जिवावर खातो. कर्तृत्व म्हणावं तर शुन्य! सिद्धार्थ P.S.I. झालाय्. नोकरीत तर आहे. बापाच्या भाकऱ्या नाही मोडत. कमावतो स्वतःपुरतं. पैसेवाल्या घरात पडून शेणमुत साफ नाही करत बसायचं मला. स्वप्नांसोबत तडजोड नाही.”
” त्यांनी जोरजबरदस्ती किंवा मारहाण केली तर?”
” विरोध अपेक्षित आहेच, पण मारहाण केली तर मात्र सरळ पोलिस कंम्प्लेंट करेन!”

____अंत्यज____

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s