रिलेशन

रिलेशन 
माह्या गर्लफ्रेंडले मी तिच्या नावानच आवाज देओ. निकनेम बिकनेम ची भानगड नवती. तिले कॉल केला. नागपूरातून दुरंतोत बसाच्या आंधी मले तिच्यासोबत मनभरून बोलाची इच्छा होती. गावात तस बोलाले जमत नाही. म्हणून ते रेल्वेस्टेशनवर भेटाले आली, १० रूप्यावालं प्ल्याटफार्म काढून. त्याचे पैसे तिनं बरोबर वसूल केले. ट्रेनचा फायनल पोंगा वाजेपर्यंत प्ल्याटफार्मवरच्या बेंचावर मले मस्त खेटून बोलत बसली. पोंगा वाजला, म्हणून जाले उठलो. माह्या जिन्सवर मागून लयमोठा रेंदा लागला होता, अस तिन कानात सांगितल. तिले बाय म्हणून दारात ऊभा रायलो. गाडी फास्ट झाली, अजनी मांग गेलं. ठेल्यावरून घेतली हुइ छोटी गोल्ड पेटवून दारातच मारली. जिन्सले चिखल वावरात वलन वलाच्या वेळेले लागला असन. तो चिखल झटकून खरवडून काढला. 
गाडीतली पब्लिक हुशार निंघाली. ग्रिस क्रायसिस वर बोलत होते. थर्ड यिअर ले ‘इंटरन्याशनल ब्यांकिंग -फायनान्स’ विषयात बंबाडं वाचल होतं. म्या माये मुद्दे मांडले, ते एका सिनीयर बावाजीले आवडले. त्यानं डबा खाचा आग्रह केला. त्याचा डब्बा संपवून मस्त झोपलो. 
झाकटीत चहा वाल्याच्या बोंबल्या आयकून झोप तुटली. कसारा घाट सरेपर्यंत दरवाज्यात बसलो. शुभ्या स्टेशनवर घ्याले अाला. मुंबईत हिंडाले लय जागा होत्या, पण शुभ्या कुलाब्याच्या लिओपोल्ड क्याफेत घेऊन गेला. तिकडे, शांताराम सुट होता. डेव्हीड ग्रेगरी रॉबर्ट याच ‘शांताराम’ माय वाचून झालत. लिओपोल्ड पुस्तकातल्या टाइपच नव्हत, जरा चांगल निंघाल. शांतारामची स्टोरी जुनी होती म्हणून तस वाटत असन. बियर पिऊन पोटभर खाऊन कुलाब्यात हिंडासाठी निंघालो. शुभ्या सरदार पटेल ले शिकला होता चार वर्ष . त्याले तिकडचा इतिहास-भुगोल माहीत होता. हिंडता हिंडता एका पोष्टरवर मायी नजर गेली. ‘MUD PARTY’, Real Clay Mud…. साले मोठ्या सिटीत रईसायचे पोट्टे पैशे देऊन चिखलात लोयते. २६\११ ले जो हल्ला त्याच्यात लोक कसे मेले, रक्तामासाचा चिखल कसा झाला होता, लोकायन कस एकमेकायले वाचवल हे ते शुभ्या सांगत होता. पण आज लोक त धावूनच रायले होते.
ट्याक्सीच्या मिटरन ३३५ रूपये बिल केल. एअरपोर्टवर सोडून शुभ्या वापस गेला. मायी फ्लाईट रात्री १:३० ले होती. म्या ट्याब्लेट काढला, २-३ मेल केले. तिचा फोन आला,तिच्या UPSC च्या निकालाची तारिख डिक्लीअर झाली.५-१० मिनीट बोलून फोन ठेवला. एक मेल आला. ‘सारा रॉंडल’ (एडमिशन ऑफिसर) चा मेल होता. त्याच्यात तिन लंडनचा नंबर, ऑक्सफर्ड मधल्या ऑफिसचा पत्ता मले पाठवला होता. फोनात नंबर सेव केला. बोर्डींग पास बनवली, फ्लाईटची अनाऊंसमेंट झाली मंग विमानात बसलो. एक झोप काढली.
पोचलो तवा सरका Blavatnik School of Government ले गेलो. त्यायन पासपोर्ट पायला. मले कागदं सह्या करासाठी दिले. काही-काही पोट्टे Mont Blanc च्या पेनायनं फटाफट सह्या मारत होते. नाझीवादापेक्शा चिनी कम्युनिस्ट परवडले, म्हणून म्या चायनामेड JINHAO पेन काढून सह्या मारत चिन्यांसोबत असणारा शेजारधर्म निभावला.
जिन्सवर चिखलाचा रंग तसाच होता. वावरातला चिखल, रईसायचा पैसेवाला चिखल, टेररिस्ट लवड्यायन केलेला मानसायच्या रक्तामासाचा चिखल, या चिखलाच काही रिलेशन असन का ब्वॉ???

____अंत्यज____

11 thoughts on “रिलेशन”

  1. ही शैली माझ्यासाठी नवीन आहे पण मला पोस्ट आणि भाषेचा लहेजा दोन्ही आवडले.
    ब्लॉगसाठी शुभेच्छा!

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s