बोलीभाषा

भाषा ही संवादाचं माध्यम असते.खरतर भाषा अशीच असावी,तशीच असावी असा अट्टाहास करणं चुकीचं आहे.कारण भाषा व तिची प्रमाणता हाच जर प्रगल्भतेचा निकष असता तर कदाचित संत गाडगेबाबा जनसामान्यांचे प्रबोधन करूच शकले नसते.त्यामुळे भाषेची थोरवी जपताना बोलिभाषेवरुन टिंगल उडवणर्‍यांना या सर्व खोलातल्या तरी साध्यासुध्या गोष्टी कळू नयेत हे खरच न उलगडणारं कोडं आहे.
वैदर्भिय लोकांची भाषेमुळे होणारी चेष्टा हा सुद्धा पुण्यात कुतूहलाचा विषय असतो.असाच एक अनुभव.

पुण्याहून आकुर्डीला जायला निघालो होतो.अर्थातच लोकलमध्ये.(Prasad सरांसारखं विमानाने प्रवास करायचा योग अजूनही आलेला नाहीये.)जागा मिळाली,तिसुद्धा खिडकीत.वाटलं आता प्रवास निवांत होणार.माझ्या शेजारीच दोन पंचविशीतले भाऊ लोक बसून अस्खलित इंग्रजीत बोलत होते.अाता कसाही असलो तरीही अर्धा इंजिनिअर आहे.त्यांच्या बोलण्यावरून तेसुद्धा कुठल्यातरी कंपनीत इंजीनियर असणार हे कळायला जास्त वेळ लागला नाही.एक टी.सि.एस. मध्ये होता.उत्तम इंग्रजी बोलत होता.
दुसरा मुंबईचा होता.बोलण्याच्या लयीवरुन दक्षिण भारतीय वाटत होता.पायात चपला,मोठमोठे ग्लासेस व माझं आजच फाटलेलं दप्तर अश्या माझ्या गबाळ्या अवताराकडे कुत्सित कटाक्ष टाकत तो त्याच्या संभाषणात व्यस्त होता.मला थोडा रागही आला,पण म्हटलं कशाला उगाच!! तसही आमचं इंग्रजी यथातथाच.शरीरसौष्टव भल्याभल्यंना लाजवणारं. 
काही मिनिटे गेली व मला माझ्या अमरावतीच्या एका मित्राचा कोल आला.

मी:काय बे म्याट तोंड्या. मोदी झाला काय बे!!!लयच दिवसान फोन कराची फुरसत भेटली बे तुले.
मित्र(फोनवर) :प्लेसमेंटच्या पार्टिले तू नव्हता फोकणीच्या.आता बाईच्या लग्नामध्ये तरी येजो बे.(बाईच्या म्हणजे त्याच्या ताईच्या)
मी:जाय न बे.तू बोलावशिण नाही त का येईन नाही मी.
आणखिही २-४ प्रेमाच्या गोष्टी बोलून मी फोन ठेवला.त्या गोष्टींना सेन्सारच ‘अ’ प्रमाणपत्र असल्यामुळे मी त्या इथे लिहिण्याचं टाळतोय.

मी फोन ठेवला.मुंबईवाला माझ्या तोंडाकडे मटमट पाहत होता.पण त्याच्यापुढचा भाऊ हात समोर करूण म्हणाला,”अमरावती काय रे बा??”
मी म्हटलं हो.

झालं.गेले १० मिनिट इंग्रजीत बोलणारा मुंबईवाला आता आमच्या गोष्टी ऐकत होता. बर्‍याच गोष्टी झाल्या.शेअर मार्केटचा विषय निघाल्यामुळे आम्ही इंग्रजीतून बोलू लागलो.आकुर्डी कधी आलं कळलसुद्धा नाही.
उतरताना मी एकदा मागे वळून पाहिलं.

त्याच्या चेहर्‍यावर आता कुठलाही कुत्सित भाव नव्हता.
—-अंत्यज—-

4 thoughts on “बोलीभाषा”

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s